काही लक्षवेधी जाहिरातपटाकडून अभिनय देवने “गेम “च्या दिग्दर्शनातून चित्रपट क्षेत्रात पुढचे पाऊल टाकले. पण “दिल्ली बेल्ली ” (२०११) या आजच्या युवा पिढीची भाषा मांडणाऱ्या चित्रपटाला चांगले यश मिळाले. त्यानंतर दिग्दर्शक म्हणून तो आता “फोर्स २ ” हा चित्रपट घेऊन आपल्यासमोर आला आहे. “फोर्स ” चे दिग्दर्शन निशिकांत कामतचे होते. पण फोर्स २ चा पहिल्या चित्रपटाशी नावाव्यतिरिक्त कसलाच संबंध नाही.