News Flash

‘नागपूर अधिवेशन – एक सहल’ मुव्ही रिव्ह्यू

विदर्भ पिक्चर्स प्रस्तुत, ‘नागपूर अधिवेशन एक सहल..’ चित्रपटातून या अधिवेशनाची एक वेगळी बाजू मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे. राजकारणापलीकडचे राजकीय रंग या हिवाळी अधिवेशनात पाहायला मिळतात. अधिवेशनादरम्यान रंगणारा गप्पांचा राजकीय फड असो की राजकारण्यांची स्टाइल हे सगळंच या काळात खूप लक्षवेधी असतं. मंत्र्यांच्या सरबराईत इथला सरकारी कर्मचारी कसा त्रासून जातो आणि शेवटी करोडो रुपये खर्च करून पार पडणाऱ्या अधिवेशनात अनेक प्रश्न अनुत्तरीतच राहतात. अशा अनेक बाबींवर या चित्रपटातून नेमकं भाष्य करण्यात आलंय. मकरंद अनासपुरे, अजिंक्य देव, मोहन जोशी, भारत गणेशपुरे या कलाकारांसह विनीत भोंडे, चेतन दळवी, अमोल ताले, संकर्षण कऱ्हाडे, दिपाली जगताप, स्नेहा चव्हाण आदी कलाकारांनी अफलातून भूमिका साकारल्या आहेत.

आणखी काही व्हिडिओ
Just Now!
X