आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी गतविजेते मुंबई इंडियन्स सज्ज झाले आहेत. १९ सप्टेंबरला मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे. परंतू यंदा संघात ख्रिस लिनच्या येण्यामुळे मुंबई इंडियन्ससमोर सलामीला कोणाला संधी द्यायची हा प्रश्न निर्माण झाला आहे. यंदाच्या हंगामासाठी काय असू शकतात मुंबई इंडियन्ससमोरचे पर्याय त्याचा घेतलेला हा आढावा…