पाकिस्तानचा क्रिकेट संघ आणि वाद हे काही आजचं समीकरण नाही. बंडाळ्या, अंतर्गत कुरघोड्या, आरोप-प्रत्यारोप, कर्णधार बदलणं, प्लेइंग-११मध्ये अचानक होणारे फेरबदल आणि प्रशिक्षकांचे राजीनामे या सगळ्यामुळे पाकिस्तान क्रिकेट कायम चर्चेत राहिलं आहे. मैदानावरचा खेळ जितका अनिश्चित, तितकंच संघाच्या पडद्यामागचं चित्रही अस्थिर दिसतं. सध्या पाकिस्तान क्रिकेट संघामध्ये वादळ आलेलं दिसत आहे. इतकंच नव्हे तर मॅच फिक्सिंगचं प्रकरणही समोर येत आहे. पाकिस्तान क्रिकेटमध्ये सध्या सुरू असलेल्या घटनांची टाईमलाईन पाहूया.





