न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेच्या तयारीदरम्यान भारताचा कर्णधार शुबमन गिलच्या डोळ्याजवळ एक छोटंसं डिव्हाईस दिसलं आणि त्याची चर्चा सुरू झाली. विशेष म्हणजे, हे डिव्हाईस केवळ फिटनेस ट्रॅक करत नाही, तर मेंदूतील रक्तप्रवाहाशी संबंधित बदल आणि शरीरावर येणारा ताण समजून घेण्यासाठीही विकसित करण्यात आलं आहे, असा दावा केला जातो. शुबमन गिल वापरत असलेलं हे उपकरण नेमकं आहे तरी काय? ते कसं काम करतं? आणि खेळाडूंना याचा काय फायदा होऊ शकतो? जाणून घेऊया.






