20 October 2019

News Flash

खडसेंच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीविरोधात गावंडेंची हायकोर्टात धाव


राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावर भोसरी येथील एमआयडीसीच्या जमीनखरेदीप्रकरणी झालेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने नेमलेल्या एक सदस्यीय समितीविरोधात हे प्रकरण उजेडात आणणारे हेमंत गावंडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती दिनकर झोटिंग यांची नियुक्ती सरकारने केली होती. पण या समितीला कायद्यातील तरतुदींचे पाठबळ नाही. त्यामुळे ही समिती रद्द करण्यात यावी आणि या प्रकरणाची केंद्रीय अन्वेषण विभाग आणि सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी याचिकेत केली आहे.

आणखी काही व्हिडिओ