09 August 2020

News Flash

आदिवासी विद्यार्थ्यांना निकृष्ट साहित्य पुरवठ्याची अजित पवारांकडून पोलखोल


आदिवासी विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाजा साहित्य पुरवठा केला जात असल्याचे पुरावे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केले. आदिवासी विद्यार्थ्यांना राज्य सरकारकडून निकृष्ट दर्जाचे साहित्य पुरविल्याप्रकरणी विधानसभेत चर्चा सुरू असताना अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्ला चढवला. विद्यार्थ्यांना सरकारच्यावतीने दिले जाणारे दंत मंजन, खोबरेल तेल, साबण असे पुरावेच पवार यांनी यावेळी विधानसभेत सादर केले. अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्री नेहमी पुरावा द्या, असं म्हणत असतात. आता मुख्यमंत्र्यांसमोर मी पुरावे सादर केले आहेत. ते त्यांनी ताब्यात घ्यावेत आणि त्वरित कारवाई करावी, अशी मागणी अजित पवार यांनी यावेळी केली.

आणखी काही व्हिडिओ

Just Now!
X