07 December 2019

News Flash

मोडकसागर, तानसा तलाव भरले, मुंबईकर सुखावले


गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहरात पडत असलेल्या जोरदार पावसामुळे मुंबईकर जरी त्रस्त झाले असले तरी त्यांना सुखावणारी एक गोष्ट या वरुणराजाने केली आहे. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी चार तलाव पूर्णपणे भरले आहेत. त्यामुळे मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.
आठवडाभर सुरु असलेल्या सततच्या पावसामुळे विहार आणि तुळशी हे तलाव आधीच भरुन वाहत होते. आता दमदार पावसामुळे मोडकसागर आणि तानसा तलावही भरुन वाहत आहे. काल रात्री ११ वाजता मोडक तलाव भरले तर तानसा तलाव रात्री अडीच वाजता भरुन वाहू लागले.

आणखी काही व्हिडिओ

Just Now!
X