24 October 2019

News Flash

औरंगाबादमधील शस्त्रसाठा प्रकरणात अबु जुंदालसह सात जणांना जन्मठेप


सन २००६ मध्ये औरंगाबादेत जप्त करण्यात आलेल्या शस्त्रास्त्र साठ्याच्या खटल्यात मोक्का न्यायालयाने आरोपी अबु जुंदालसह सात जणांना मंगळवारी मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अन्य दोन आरोपींना १४ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. देशाविरोधात युद्ध पुकारणे, शस्त्रसाठा बाळगणे आणि अन्य आरोप सिद्ध झाल्याने गेल्या आठवड्यात न्यायालयाने या प्रकरणात १२ जणांना दोषी ठरवले होते. उर्वरित तीन आरोपींना ८ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मात्र, त्यांनी ही शिक्षा निकाल येण्याआधीच भोगली असल्यामुळे त्यांची सुटका झाली आहे.
या खटल्यामध्ये सरकारी पक्षाने सर्व आरोपींवर लावलेले संघटित गुन्हेगारीसाठीचे मोक्का कलम न्यायालयाने निकाल देताना वगळले होते. २००२ मधील गुजरात दंगलीनंतर तेथील तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि विश्व हिंदू परिषदेचे प्रवीण तोगडिया यांच्याविरोधात आरोपींनी कट रचला होता, असेही निरीक्षण मोक्का न्यायालयाने मांडले.

आणखी काही व्हिडिओ