28 May 2020

News Flash

मुंबई-गोवा महामार्गावरील पूल कोसळला, एसटी बससह अनेक वाहने वाहून गेली


मुंबई-गोवा महामार्गावर राजेवाडी फाट्याजवळ असलेला जुना पूल मंगळवारी रात्री कोसळला. या पूलावरून निघालेल्या दोन एसटी बससह सहा ते सात वाहने यामुळे सावित्री नदीच्या पाण्यात वाहून गेली. या वाहनांचा आणि त्यामधील प्रवाशांचा अद्याप शोध लागलेला नसून, घटनास्थळी मदतकार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाचे जवान दाखल झाले आहे. मदतीसाठी नौदल आणि तटरक्षक दलालाही पाचारण करण्यात आले आहे. कमकुवत झालेल्या या पूलावरून वाहतूक सुरू होती. गेल्या दोन दिवसांपासून रायगडमध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे हा पूल वाहून गेल्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे. हा पूल १०० वर्षे जुना आहे.

आणखी काही व्हिडिओ

Just Now!
X