मंगळवारी दिवसभर पुण्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पुण्याला पाणीपुरवठा करणारे खडकवासला धरण ९९ टक्के भरले आहे. या धरणातून बुधवारी दुपारी १२च्या सुमारास १८४९० क्सुसेक वेगाने मुठा नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास पाणी सोडण्याचे प्रमाण वाढविण्यात येईल, असे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले.