News Flash

महाड दुर्घटना: आंजर्ले आणि हरिहरेश्वर समुद्रकिनाऱ्यांवर मृतदेह सापडले


कोकणातील आंजर्ले आणि हरिहरेश्वर या दोन समुद्रकिनाऱ्यांवर दोन वाहून आलेले मृतदेह सापडले आहेत. हे मृतदेह पूल कोसळल्यामुळे महाडच्या सावित्री नदीत वाहून गेलेल्या लोकांपैकी असण्याची शक्यता आहे. या मृतदेहांची ओळख पटणे बाकी आहे. आंजर्ले समुद्रकिनाऱ्यावर काहीवेळापूर्वी खाकी गणवेशातील एक मृतदेह आढळला. या मृतदेहाच्या अंगावर खाकी गणवेश आणि एसटी कर्मचाऱ्याचा बिल्ला (८२३४) आहे. त्यामुळे हा मृतदेह जयगड-मुंबई एसटीचे चालक एस एस कांबळे यांचा असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आंजर्लेचा समुद्रकिनारा हा घटनास्थळापासून साधारण १३० किलोमीटर अंतरावर आहे. सावित्री नदी श्रीवर्धननजीक अरबी समुद्राला मिळते. मात्र, भरती-ओहटीच्या प्रवाहांमुळे हा मृतदेह बाणगंगा खाडीतून आंजर्लेच्या दिशेेने वाहत गेल्याची शक्यता आहे. तर हरिहरेश्वर येथे सापडलेला मृतदेह वयस्कर महिलेचा आहे. हरिहरेश्वर घटनास्थळापासून ८० किलोमीटर अंतरावर आहे. याबद्दल प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, सावित्री नदी अरबी समुद्राला मिळते त्या मुखाच्या ठिकाणी तटरक्षक दलाची सीजीएस संकल्प ही गस्तीनौकाही तैनात करण्यात आली आहे.

आणखी काही व्हिडिओ
Just Now!
X