केंद्र सरकारने नागरिकांना आनंदाची बातमी दिली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्यात आली आहे. पेट्रोलचे दर प्रति लीटर एक रुपया, तर डिझेलचे दर प्रति लीटर दोन रुपयांनी स्वस्त झाले आहेत. दर महिन्याच्या १ आणि १५ तारखेला सरकारकडून आंतरराष्ट्रीय स्तरावरील कच्च्या तेलाच्या दरांचा आढावा घेतला जातो. त्यानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या दरांची नव्याने रचना करण्यात येते.