News Flash

दहीहंडीवर हायकोर्टाने घातलेली बंधने सुप्रीम कोर्टाकडून कायम


दहीहंडी फोडताना लहान मुलांचा समावेश करू नये तसेच २० फुटांपेक्षा अधिक मोठा थर लावू नये, हा मुंबई उच्च न्यायालयाने २०१४ मध्ये दिलेला निर्णय सर्वोच्च न्यायालायने बुधवारी कायम ठेवला. त्यामुळे यावेळी दहीहंडी सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांनुसारच करावी लागणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने गेल्यावर्षी अंतरिम स्थगिती दिली होती. पण बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर मुंबईतील दहीहंडी उत्सव साजरा करणाऱ्या काही आयोजकांनी नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आता कसला उत्सव साजरा करायचा, असा प्रश्न उपस्थित केला आहे. राज्य सरकारवरही त्यांनी याबद्दल टीका केली.

आणखी काही व्हिडिओ
Just Now!
X