पूर्व दिल्लीतील खुरेजी परिसरातील एका बेकरीत स्फोट झाल्याने तीन कामगार ठार तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना गुरूवारी पहाटे ५.३० च्या सुमारास घडली. प्रथमदशर्नी हा बेकरीतील ओव्हनचा स्फोट झाला असण्याची शक्यता पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. स्फोट झाला त्यावेळी बेकरीत सुमारे २० कामगार काम करत होते. जखमींवर हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत.