News Flash

गायींची तस्करी करणाऱ्यांना मारा पण हाडे तोडू नका- विहिंप


गायींची तस्करी करणाऱ्यांना मारा पण त्यांची हाडे तोडू नका. जेणेकरून पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागणार नाही, असा सल्ला विश्व हिंदू परिषदेने (विहिंप) गोरक्षकांना दिला आहे. पश्चिम उत्तर प्रदेशातील ब्रज आणि उत्तराखंड परिसरातील विहिंपच्या नेत्यांनी ‘ मारा पण हाडे तोडू नका’ ही पळवाट सुचविल्याचे वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ या दैनिकात प्रसिद्ध झाले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार गोरक्षक विभागाच्या केंद्रीय समितीचे सदस्य खेमचंद यांनी विहिंपचे सदस्य नसलेल्यांनीही गायींच्या तस्करीचा व्यापार रोखण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. आपण कायदा हातात घेता कामा नये. मी अनेकदा कार्यकर्त्यांना सांगतो, मारा पण हाडे तोडू नका.

आणखी काही व्हिडिओ
Just Now!
X