कावेरी पाणीवाटपासंदर्भात सुप्रीम कोर्टाच्या निकालावरुन कर्नाटकमध्ये हिंसाचार उसळला आहे. यावरुन शिवसेनेने कर्नाटकवर निशाणा साधला आहे. शेवटी कानडी लोकांना अन्याय काय असतो हे समजले. पण सीमा भागातील मराठी माणसांवर कानडी लोक जे अत्याचार करतात त्याला काय म्हणायचे असा खोचक सवाल सेनेने उपस्थित केला आहे.

















