19 September 2020

News Flash

राहुल गांधी यांच्या दिशेने बूट फेकला, व्यक्तिला पोलिसांनी घेतले ताब्यात


उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनामध्ये काँग्रेसची प्रतिमा उजळ करण्याचा प्रयत्न करण्याच्या उद्देशाने रोड शो करणाऱ्या राहुल गांधीच्या दिशेने सोमवारी बूट भिरकावण्यात आला. सीतापूरच्या रॅलीदरम्यान हा प्रकार घडला. राहुल गांधी उघड्या जीपमधून गर्दीला अभिवादन करत असताना हा प्रकार घडला. यावेळी गाडी मंदगतीने पुढे सरकत असल्यामुळे राहुल यांना बूट लागला नाही. दरम्यान राहुल यांच्या दिशेने बूट फेकणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या व्यक्तीचे नाव तसेच त्याने हा प्रकार का केला याबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.

आणखी काही व्हिडिओ

Just Now!
X