अभिनय देवच्या दिग्दर्शनात साकारलेला ‘फोर्स २’ हा चित्रपट २०११ साली प्रदर्शित झालेल्या ‘फोर्स’चा सिक्वल आहे. जिथे ‘फोर्स’ चित्रपटाची कथा संपली होती. तिथूनच ‘फोर्स २’ ची कथा सुरु होईल असे म्हटले जातेय. या चित्रपटात ती एका रॉ एजन्टची भूमिका साकारत आहे. जॉन अब्राहमने ‘फोर्स २’ चित्रपटाचा ट्रेलर ट्विटरवर शेअर केला आहे. नुकताच चित्रपटाचा पोस्टरही प्रदर्शित करण्यात आला होता. या पोस्टरवर ‘रॉ ट्रूथ’ असे लिहण्यात आले आहे. हा पोस्टर चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढवणारा आहे. देशाच्या रक्षणासाठी प्राण देऊनही ओळख न मिळालेल्या शूरवीरांना हा चित्रपट समर्पित केल्याचे ट्रेलरच्या सुरुवातीला दाखविण्यात आले आहे.