News Flash

सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे न जाहीर करण्याचा केंद्राचा निर्णय

भारतीय लष्कराकडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे जाहीर न करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. हे पुरावे जाहीर झाल्यास पाकिस्तानी लष्कर अडचणीत येऊ शकते आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील भारताच्या मुत्सद्देगिरीच्या प्रयत्नांना खीळ बसू शकते. त्यामुळे हे पुरावे सार्वजनिक न करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे समजते.

आणखी काही व्हिडिओ
Just Now!
X