News Flash

बँकेतून एकदा पैसे काढल्यानंतर बोटावर शाई लावणार

बँकातील गर्दीची परिस्थिती पाहता सरकारकडून बँकेतून एकदा पैसे काढल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या बोटावर खूण म्हणून मतदानासारखी शाई लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय अर्थसचिव शक्तिकांता दास यांनी मंगळवारी नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत यासंबंधीची माहिती दिली. काही लोक बँकेतून किंवा एटीएममधून दिवसभरात वारंवार पैसे काढत असल्यामुळे विनाकारण गर्दी वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे.

आणखी काही व्हिडिओ
Just Now!
X