नोटाबंदीच्या निर्णयावरुन काँग्रेसने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी पहाटे दिल्लीतील जनकपूरी आणि इंद्रपूरीमधील एटीएम केंद्राला भेट दिली. एटीएम केंद्राबाहेर रांगेत उभे असलेल्या लोकांशी राहुल गांधींनी संवाद साधला.