बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान आता मुंबईकरांना स्वच्छतेचा संदेश देताना दिसला तर आश्चर्य वाटून घेऊ नका. मुंबई महापालिकेने सलमानची स्वच्छता अभियानाचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे आता सलमान मुंबई महापालिकेच्या स्वच्छता अभियानाचा चेहरा बनणार आहे.