28 January 2020

News Flash

भाजप नेत्यांच्या मातोश्री भेटीनंतर उद्धव ठाकरे शिवस्मारकाच्या भूमिपूजनाला उपस्थित राहणार

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या भूमीपूजन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. २४ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमीपूजन सोहळा संपन्न होणार आहे. यथोचित सन्मान होणार असेल, तरच या सोहळ्यासाठी उपस्थित राहू, असा पवित्रा उद्धव ठाकरे यांनी घेतला होता. त्यामुळे नाराजी नाट्यदेखील पाहायला मिळाले होते. मात्र या नाराजी नाट्यावर अखेर पडदा पडला आहे. भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील आणि विनोद तावडे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना सोहळ्याचे निमंत्रण दिले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंची नाराजी दूर झाली आहे.

आणखी काही व्हिडिओ

Just Now!
X