पाचशे आणि एक हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या घोषणेनंतर देशात अभूतपूर्व चलनकल्लोळ निर्माण झाला. तो निस्तरण्यासाठी केंद्राकडून सातत्याने उलटसुलट घोषणा करण्यात आल्या. नोटाबंदीच्या या निर्णयाला आज, मंगळवारी ५० दिवस पूर्ण झाले. जुन्या नोटा बँकेत भरण्याची अंतिम मुदत आता अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपलेली आहे.