मुंबई, ठाणेसह राज्यातील १० महत्त्वाच्या महापालिकांमधील निवडणुकीचा कार्यक्रम बुधवारी जाहीर होणार आहे. मुंबई, ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, नागपूर, अकोला, अमरावती आणि सोलापूर या १० महापालिकांमध्ये निवडणूक होणार आहे. महापालिकेसोबत २६ जिल्हा परिषदांमधील निवडणुकीचा कार्यक्रमही आजच जाहीर होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर तापलेल्या राजकीय वातावरणाचा घेतलेला आढावा.