12 December 2018

News Flash

‘नाईट ट्रेक’ एक भन्नाट अनुभव!

ट्रेकिंग में हमारी जान बसती है यारों…’ असं म्हणणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशाच काही ट्रेकिंगवेड्यासोबत आम्हीदेखील ट्रेकींगला गेलो होतो. बोचऱ्या थंडीतील ‘नाईट ट्रेक’ असल्याने हा अनुभव हटके होता. रात्रीच्या शांततेत निसर्ग आणि अंधाराच्या साथीने अवघड वाटांवर अनेकांना काही गोष्टी नव्याने गवसल्या. कोणामध्ये दडलेला गायक जागा झाला, तर कोणी आपल्यातील कल्पनाशक्तीला जागं केलं. कोणाच्या मनात आठवणींनी घर केलं होतं, तर कोणी फक्त त्या शांततेत स्वत:ला शोधण्यात गुंतलं होतं. गार्बेटच्या या ‘नाईट ट्रेक’ने आम्हा सर्वांनाच एका वेगळ्या विश्वात नेलं.
* रात्री बाराच्या ठोक्याला भिवपूरी रोड येथून या ट्रेकची सुरुवात झाली.
* भिवपूरी रोड रेल्वे स्थानक ते गार्बेट पॉईंट हे अंतर ९.११ किमी आहे.
* हे अंतर पार करायला ६ तास लागले

आणखी काही व्हिडिओ