या विमा कंपनीकडून शेतकर्यांना पीक विम्याचे पैसे दिले जात नसल्याचा आरोप करत, पुण्यातील शिवसैनिकांनी कोरेगाव पार्क येथील मंगलदास रोडवरील इफ्को टोकिओ या विमा कंपनीचे कार्यालय आज फोडले. यावेळी कार्यालयातील कॉम्प्युटरसह अन्य वस्तूंची देखील तोडफोड करण्यात आली.