पु. ल. देशपांडे. मराठी साहित्य संस्कृतीला समृद्ध करणारे लेखक. पु.ल. देशपांडे यांचा जन्मशताब्दी सोहळा पु्ण्यात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे, ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल, ज्येष्ठ रंगकर्मी माधव वझे, ज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार आदी मान्यवरांची उपस्थिती होती. साहित्य संस्कृती जगतातील या मान्यवरांनी ‘पुलं’विषयीच्या आठवणींना उजाळा दिला.