राज्यात सध्या राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यात सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना शपथविधीबद्दल विचारलं असता त्यांनी याबाबत राजभवनातच चौकशी करा, अशी प्रतिक्रिया दिली.