पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीत उषा ऊर्फ माई ढोरे यांनी विजय मिळवला. विजयानंतर उषा ढोरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. “आताच माझी महापौरपदी निवड झाली. त्यामुळे शहराच्या विकासात ज्या कमतरता राहिल्या आहेत. त्यांचा अभ्यास करून मी प्राधान्य देणार आहे. पक्षाला कोणत्याही प्रकारचा कमीपणा वाटेल अशी चुकी करणार नाही. जबाबदारीने वागेन, असं ढोरे म्हणाल्या.