शरद पवारांनी आजच्या शपथविधी सोहळ्यात मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी राष्ट्रवादीचे जे दोन आमदार निवडले आहेत, त्यात माझे नाव आहे आणि मी सायंकाळी शपथ घेणार आहे. असे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी पुणे येथे सांगितले आहे. आज महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाची आज सायंकाळी शिवाजी पार्कवर शपथ घेणार आहेत.