आजवर आपण महिलांच्या सौंदर्य स्पर्धा पाहिल्या असतील. मात्र पुण्यामध्ये चक्क ‘राज्यस्तरीय रिक्षा सौंदर्य’ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेमध्ये अनेक रिक्षाचालकांनी सहभाग घेतला असून आपल्या रिक्षा निरनिराळ्या पद्धतीने सजविल्या आहेत. सोबतच काही रिक्षांच्या माध्यमातून सामाजिक संदेशही देण्यात आला आहे.