हिंजवडी परिसरातील अलार्ड महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर सोमवारी ‘एसएससी’ बोर्डाच्या कनिष्ठ लिपिक पदासाठी घेण्यात येणारी परीक्षा रद्द करण्यात आली होती. त्यानंतर आज ही परीक्षा घेतली जाणार होती, मात्र आज देखील ही परीक्षा होऊ न शकल्याने, परीक्षार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. आजचा पेपर रद्द झाल्याचा मेसेज परीक्षार्थ्यांच्या मोबाइलवर आला आहे. तांत्रिक अडचणींमुळे आजची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.