विधान भवन परिसरात आंदोलन करणाऱ्या भाजपाला उत्तर देण्यासाठी आमदार प्रकाश गजभिये यांनी एकट्याने आंदोलन केले. यासाठी त्यांनी हातात एक छोटा फलक घेतला होता. त्यावर “म. गांधींचा खून मी केला. मी नथुराम गोडसे बोलतोय. या देशात माझेच विचार चालतील” असा मजकूर लिहिला होता.