थंडीचा कडाका सर्वत्रच हळू हळू जाणवायला लागला आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील सारसबाग येथील गणरायाला देखील स्वेटर परिधान करण्यात आले आहे. स्वेटरमधील बाप्पाचे सुंदर रुप बघण्यासाठी पुणेकर एकच गर्दी करत आहेत. दरवर्षी थंडी सुरु झाली की, सारसबागेतील गणपती मंदिरातील गणरायाला स्वेटर परिधान करण्यात येते. या गणपतीला तळ्यातील गणपती म्हणून ओळखले जाते.