पुणे येथील स्फेर्युल फाउंडेशनच्यावतीने यंदा ख्रिसमस निमित्त विशेष उपक्रम राबवण्यात आला. रस्त्यांवरील सिग्नलवर फुलं, फुगे इत्यादी विकणाऱ्या गरीब मुलांना विमाननगर येथील फिनिक्स मॉल मध्ये नेण्यात आले. या ठिकाणी मुलांना खाऊ देण्यात आला तसेच विविध खेळ देखील खेळू दिले. मॅकडोनल्डकडू देखील मुलांना मोफत खाऊ वाटप करण्यात आला.या उपक्रमासाठी फिनिक्स मॉलच्यावतीने सहाकार्य करण्यात आले.