जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी आणि प्राध्यापकांवर रविवारी झालेल्या जीवघेण्याच्या हल्ल्याची जबाबदारी ‘हिंदू रक्षा दल’ या संघटनेने स्विकारली आहे. या संघटनेचा नेता भुपेंद्रकुमार तोमर ऊर्फ पिंकी चौधरी याने याची माहिती दिली. आपण हिंदू रक्षा दलाचा राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचे त्याने म्हटले आहे. एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून याद्वारे त्याने आपलं म्हणणं मांडलं आहे.