पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरुन सध्या मोठा गदारोळ माजला आहे. राज्यात ठिकठिकाणी या पुस्तकाच्या निषेधार्थ आंदोलने केली जात आहेत. पुण्यातही ‘लाल महाला’बाहेर सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शहराध्यक्ष आमदार चेतन तुपे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.