संजय राऊत यांनी उदयनराजे भोसले यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी उद्या सांगली बंदची हाक दिली आहे. उदयनराजेंनी एक पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर टीका केली होती. तसंच शिवसेनेचे नाव आता ठाकरे सेना करा असंही म्हटलं होतं. या टीकेला उत्तर देताना संजय राऊत यांनी उदयनराजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत याचे पुरावे द्यावे असं म्हटलं होतं. संजय राऊत यांनी हे वक्तव्य केल्याने त्यांच्यावर टीका होऊ लागली. आता याच वक्तव्याचा निषेध नोंदवण्यासाठी उद्या शिवप्रतिष्ठानतर्फे सांगली बंदची हाक देण्यात आली आहे.