मुंबईतील वाडिया रुग्णालयाच्या निधीवरून वाद निर्माण झाला आहे. याविषयी वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा निधी रुग्णालयाला देण्यात यावा, असं म्हटलं होत. त्यावर अजित पवार यांनी राज्य सरकारच्या वतीनं भूमिका मांडली.