मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पक्षाच्या नव्या झेंड्याचं अनावरण करण्यात आलं आहे. मनसेचं महाअधिवेशन आज पार पडत असून राज ठाकरे यांनी यावेळी पक्षाच्या नव्या झेंड्याचं अनावरण केलं. मनसेच्या नव्या झेंड्यात भगवा रंग असून त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे.