सैराट या चित्रपटामधून नावारुपाला आलेली अभिनेत्री रिंकू राजगुरू हे नाव आज प्रत्येक घराघरात पोहोचलं आहे. कमी वयामध्ये रिंकूने अफाट लोकप्रियता मिळविली. मात्र यशाच्या शिखरावर असणाऱ्या रिंकूला एका गोष्टीची कायम खंत वाटते. ही खंत नेमकी कशाची आहे हे रिंकूने ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’मध्ये सांगितलं.