मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाचा झेंडा बदलला आहे. काही दिवसापूर्वी त्यांच्या हस्ते पक्षाच्या नव्या झेंड्याचं अनावरण करण्यात आलं. मनसेच्या नव्या झेंड्यात भगवा रंग असून त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे. नुकतीच राज ठाकरे यांनी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं आणि यावेळी आपल्या पक्षाचा नवा झेंडा बाप्पाच्या चरणी अर्पण केला.