एआयएमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी बोलण्यासाठी उभे असतानाच एका तरुणीनं व्यासपीठावर येऊन ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्याचा प्रकार समोर आला आहे. यासंदर्भातील व्हिडीओ ‘एएनआय’नं ट्विट केला आहे. ओवेसी यांच्या बंगळुरू येथील सभेदरम्यान ही घटना घडली आहे.