‘सद् रक्षणाय खल निग्रहणाय’ हे महाराष्ट्र पोलिसांचं ब्रीद आहे. त्याला सार्थकी लावणार काम मुंबई पोलिसांनी केलं आहे. भरतीच्या वेळी मरीन ड्राईव्हजवळ टेट्रापोडवर अडकलेल्या एका कुत्र्याला कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी सुरक्षितपणे बाहेर काढलं. हा व्हिडीओ गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट केला आहे.