होळी असल्यामुळे सध्या देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. आपल्याकडे महाराष्ट्रात पहिल्या दिवशी होळी पूजन केले जाते. होळी पुजनाला आपल्याकडे शिमगा असेही म्हणतात. यंदा विरारमधील काही तरुणांनी मिळून खास पद्धतीने होळी साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. एका राक्षसाच्या पुतळ्याच्या माध्यमातून त्यांनी समाजातील अपप्रवृत्तींचं दहन करण्याचा निर्णय घेतला आहे.