गुढीपाडव्या निमित्त पंढरपूरात श्री विठ्ठल आणि रूख्मिणीमातेस चाफा, मोगरा, गुलाबाच्या फुलांची आरास करण्यात आली आहे.
चाफा, मोगरा, गुलाब आणि तुळस असे चार रंगांच्या जवळपास १५० किलो फुलांची आरास केली आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी हि आरास केली आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल मंदिर दर्शनासाठी बंद ठेवले आहे. तरी या व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घेता येईल