करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २१ दिवसांचा लॉकडाउन मोदी सरकारतर्फे जाहीर करण्यात आला आहे. या लॉकडाउनमध्ये ज्यांचं हातावर पोट आहे त्या सगळ्यांचे हाल होऊ नयेत म्हणून केंद्र सरकारने भल्यामोठ्या पॅकेजची घोषणा केली आहे. या पॅकेजमध्ये गोरगरीब जनता, रोहयोचे कामगार, विधवा, दिव्यांग या सगळ्यांसाठी तरतुदी करण्यात आल्या आहेत. कुणाला काय मिळालं जाणून घ्या या व्हिडीओच्या माध्यमातून
2nd vdo
‘लॉकडाउन’दरम्यान पुण्यात दिसली खाकीतली माणुसकी
करोना विषाणूमुळे सध्या अवघा देश बंद असल्याने अनेकांना समस्यांचा सामना करावा लागतोय. विनाकारण घराबाहेर पडलेल्यांना पोलीस परत पाठवतायेत, तर काही ठिकाणी स्वतः पोलीस मदत करत असल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्यात असाच प्रकार समोर आला आहे. वाहन नसल्याने पाच दिवसाच्या तान्ह्या बाळाला घेऊन दवाखान्याबाहेर अडकलेल्या एका महिलेला आणि तिच्या पतीला पोलिसांनी आपल्या सरकारी वाहनात बसवून तिच्या घरी सोडलं. एकीकडे विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांना तेल लावलेल्या काठीने पोलीस मारत आहेत. तर दुसरीकडे मात्र खाकीतली माणुसकी दिसत आहे. या दोन्ही गोष्टीमुळे पोलिसांचं सर्वत्र कौतुक होत आहे.