चीनच्या वुहान शहरातून सुरू झालेला करोनाचा हाहाकार आता अर्ध्या जगाला लॉकडाउनच्या खायीत लोटून गेला आहे. करोनाचा सगळीकडेच कहर वाढू लागला आहे. अमेरिका आणि इटलीसारख्या शहरामध्ये रोज करोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या वाढू तर लागली आहेच शिवाय बळी गेलेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या करोनामुळे भारत तर लॉकडाउन झाला आहेच, आता जाणून घेऊया जगात नेमकी काय परिस्थिती आहे.